मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूवरच्या झायडस कोडिलाच्या लशीची लहान मुलांवरच्या चाचणीला मुंबईत लवकरच सुरुवात होणार आहे. ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. यामध्ये पहिल्या दिवशी, २८ व्या दिवशी आणि ५६ व्या दिवशी डोस दिला जाईल. मुलांची नोंदणी झाल्यानंतर तातडीनं लसीकरणाची चाचणी  सुरू होईल, असं ते म्हणाले.