मुंबई (वृत्तसंस्था) : भूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत केले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. नदीनाल्यांमध्ये होणारे पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. जलपुनर्भरण, पाणी गुणवत्ता या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमांत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतांना केल्या.