मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीनं योगदान देत असतात. मात्र, सर्वांना आरोग्य सेवा आणि शिक्षण उपलब्ध करून, तसंच गरिबी दूर करुन देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकानं समाजासाठी अधिक योगदान दिलं पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल मुंबईत केलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३१ निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन इथं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कृत मान्यवरांमध्ये गोदरेज समुहाचे अध्यक्ष आदी गोदरेज, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, वकील उज्ज्वल निकम, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर गौतम भन्साळी इत्यादींचा समावेश होता.