नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारने देशभरातल्या शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीसाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिलेली मुदत यावर्षीच्या ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत लिखीत उत्तरात ही माहिती दिली. आत्तापर्यंत देशभरातल्या ९२ पूर्णांक ८ दशांश टक्के शिधापत्रिकांची आधार जोडणी पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.