नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय येत्या एक ऑगस्ट पासून जनतेसाठी खुलं होत आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पासून ते बंद होतं. नागरिकांना सरकारी सुट्ट्या वगळता शनिवार आणि रविवारी तीन वेगवेगळ्या वेळात राष्ट्रपती भवन आणि परिसराला भेट देता येणार आहे. एका वेळेला केवळ २५ नागरिकांना प्रवेश दिला जाईल. राष्ट्रपती भवन संग्रहालय मात्र सरकारी सुट्ट्या वगळता आठवड्यातून मंगळवार ते रविवार असं सहा दिवस खुलं राहणार असून एका वेळेला ५० नागरिकांना ठरवून दिलेल्या वेळेत प्रवेश दिला जाईल.