मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम असून एनडीआरएफच्या २६ पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नंदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून साताऱ्यात वारणा आणि येरला नद्या धोक्याच्या फातळीवरुन वाहत आहेत. या नदी काठवरच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड आणि महाड या परिसरात पूरपरिस्थिती ओसरली असून तळीये खेड्यात भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेत ३७ मृत्यदेह शोधण्यात आले आहे. या दुर्घटनेत बाधित झालेल्यांना एनडीआरएफतर्फे अन्न पाकीट तसेच इतर साम्रगी दिली जात आहे.