मुंबई : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेअंतर्गत ‘इमारत बांधकाम/ विस्तार व नुतनीकरण’ या योजनेसाठी राज्यातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देण्यात येते.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या सहकार्याने शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांना कार्यान्वीत करण्यासाठी समान निधी तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार-बांधणीसाठी अर्थसहाय्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 16 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, अधिक माहितीसाठी संकेतस्थळ www.rrrlf.nic.in वर संपर्क करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.