मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात इतर मागास वर्गाच्या राजकीय आरक्षणाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत ही भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका आहे असं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. जातीनिहाय आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याची गरज असून आरक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकाला आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं फडनवीस यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षात संघटनात्मक पातळीवर कोणतेही फेरबदल केले जाणार नसून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उत्तम काम करत आहेत असंही फडनवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.