नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३६ हजार ४०१ नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३९ हजार १५७ कोरोना रुग्ण बरे झाले. काल कोरोनामुळे ५३० जणांच्या मृत्युंची नोंद झाली. उपचाराखालील कोरोना रुग्णांच्या संख्येत ३ हजार २८६ नं घट झाली. सध्या ३ लाख ६४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांचं प्रमाण आणखी घटून आता १ पूर्णांक १३ शतांश टक्के झालं आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाणही वाढून ९७ पूर्णांक ५३ शतांश टक्के झालं आहे.देशात कोरोनामुळे आजवर ४ लाख ३३ हजारांहून अधिक रुग्ण दगावले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींच्या ५६ कोटी ६४ लाखांहून अधिक मात्रा आजवर देऊन झाल्या आहेत. देशात काल दिवसभरात ५६ लाख ३६ हजारांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.