नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम असो वा रहीम, भारतात श्रद्धा भाव दृढ करण्याचीही वेळ असल्याची प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.  अयोध्येबाबतच्या निकालाचं केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह  विविध राजकीय नेत्यांनी स्वागत केलं आहे.

रामलल्लाचे वकील सी.एस. वैद्यनाथन् यांनी निकालाचं स्वागत केलं तर आपण या निकालाने समाधानी नाही, मात्र फेरविचार याचिकाही दाखल करणार नाही, असं सुन्नी वक्फ बोर्डानं स्पष्ट केलं आहे.