मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही बरे झालेल्या कोविड रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. काल ४ हजार ७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ५ हजार १०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५९ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ४२ हजार ७८८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६२ लाख ५२ हजार १५० रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३६ हजार ७३० रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५० हजार ३९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ५६२ झाली आहे. कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ४७ हजार ६९२ झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात काल ४ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निदान झालं, तर १ रुग्ण कोरोनामुक्त झाला. सध्या ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ९१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

परभणी जिल्ह्यात काल फक्त एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला. जिल्ह्यात ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ४९ हजार ९१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.