JABALPUR, AUG 26 (UNI)- A health worker administering COVID-19 vaccine to an elderly women, at a vaccination centre in Jabalpur on Thursday. UNI PHOTO-47U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ६४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५९ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांन लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयान सांगितलं. आतापर्यंत देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची संख्या ६४ कोटी ५ लाखाच्या वर गेली आहे. देशात काल ३६ हजार २७५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी १९ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. देशात काल ३० हजार ९४१ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात सुमारे ३ लाख ७० हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.