नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला आणि 17 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध अधिक दृढ करायला भारत महत्व देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही बळकट लोकशाही आहेत. वाढते आर्थिक संबंध, वाढता उच्चस्तरीय संवाद आणि दोन्ही देशातल्या नागरिकांमधले संबंध यामुळे आपल्या संबंधांना मिळालेली गती पुढेही अशीच राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

ऑस्ट्रेलियात अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान मॉरीसन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या लिबरल-नॅशनल कोइलिशन पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पंतप्रधान मॉरिसन यांना भारत भेटीचे पुन्हा आमंत्रण दिले.