नवी दिल्ली : भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांनी भारताला दिलेल्या समर्थ नेतृत्वाचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठे यश मिळवेल, अशी आशा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छांबद्दल आभार मानले. भूतानसोबत असलेले विशेष द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी काम सुरु ठेवण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.