नवी दिल्ली : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-30 MKI या विमानातून 500 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब सोडून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात आला.