नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ४० हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी २३ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के आहे. काल ४३ हजारापेक्षा जास्त नवे रूग्ण आढळले, तर ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात ३ लाख ९३ हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. देशभरात काल कोविड प्रतिबंधक लशींच्या ८६ लाख ५१ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. लसीकरण मोहिमेतंर्गत देशात आतापर्यंत दिलेल्या मात्रांची संख्या ७१ कोटी ६५ लाखाच्या वर गेली आहे.