नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला तर्फे पुण्यातल्या येरवडा ते दिल्लीतल्या राजघाट पर्यंत आयोजित सायकल रॅलीनं काल धुळ्यातल्या शिरपूर इधं मुक्काम केल्यानंतर आज सकाळी मध्य प्रदेशच्या दिशेनं रवाना झाली. एसपीडीएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही एम पाटील आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. विविध घोषणांनी या रॅलीला निरोप देण्यात आला. ही रॅली मुंबई- आग्रा राष्ट्रीय मार्गानं आज संध्याकाळी मध्य प्रदेशात पोचेल, अशी माहिती सीआयएसएफ युनिटचे दिनेश चौधरी यांनी आकाशवाणीला दिली.