PATNA, JULY 20 (UNI):- A beneficiary receiving COVID-19 vaccine dose at New Government Polytechnic, in Patna on Tuesday. UNI PHOTO-8U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणांत देशभरातील  ६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत पात्र नागरिकांना पहिली मात्रा देण्याचं काम १०० टक्के पूर्ण केलं आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दिव, गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, लक्षद्विप आणि सिक्किम अशी ही राज्य आहेत. आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी या राज्यांचं अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशनं ५५ लाख ७४ हजार, दादरा, नगर हवेली आणि दमण आणि दिव मध्ये ६ लाख २६ हजार, लडाखमध्ये १ लाख ९७ हजार, लक्षद्विपमध्ये ५३ हजार ४९९ तर सिक्किममध्ये ५ लाख १० हजार पात्र नागरिकांना लसींची पहिली मात्रा देण्यात आली आहे. या भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठीची वचनबद्धता याबद्दल मांडवीय यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.