नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबमधील काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवनिर्वाचित नेते चरणजित सिंग चन्नी यांनी आज पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सुखजिंदर सिंग रंधवा आणि ओ.पी. सोनी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हे दोघंही उप मुख्यमंत्री असतील असं मानलं जात आहे. शेवटच्या क्षणी ब्रम्ह मोहिंद्र यांच्याऐवजी ओ.पी. सोनी यांना संधी देण्यात आली. ब्रम्ह मोहिंद्र यांनी उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे.