नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई-श्रम पोर्टलवर नोंदणीच्या बाबतीत ओडिशा राज्यानं दुसरा क्रमांक लावला आहे. ओडिशामधील असंघटित क्षेत्रातील २१ लाख ६९ हजारहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर यापूर्वीच स्वतःची नोंदणी केली आहे. देशातील असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांची आकडेवारी गोळा करण्यासाठी, केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यात ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली होती. सन २०१९-२०च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशामध्ये सुमारे ३८ कोटी असंघटित कामगार असून यापैकी १ कोटींहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर यापूर्वीच स्वतःची नोंदणी केली आहे.