नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ४८ पूर्णांक २७ शतांश झाला आहे. गेल्या २४ तासात ५ हजार ३५५ रुग्ण बरे झाले. या काळात ९ हजार ८५१ नवे रुग्ण आढळले तर २७३ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात संक्रमितांची संख्या २ लाख २६ हजार ७७० झाली आहे. त्यातले १ लाख ९ हजार ४६१ रुग्ण बरे झाले असून १ लाख १० हजार ९६० उपचार घेत आहेत. आतापर्यंत देशभरात ६ हजार ३४८ जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे.

राज्यात काल १ हजार ३५२ रुग्ण बरे झाले तर २ हजार ९३३ नवे कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे एकंदर बाधितांची संख्या ७७ हजार ७९३ झाली आहे. बरे झालेल्यांची संख्या ३३ हजार ६८१ आहे तर कोविड-१९ नं आतापर्यंत २ हजार ७१० रुग्णांचा मृत्यू झाला. या पैकी १२३ मृत्यूंची नोंद काल झाली. राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ४३ पूर्णांक २९ शतांश टक्के असून मृत्यू दर ३ पूर्णांक ४८ शतांश टक्के आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातल्या ३० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १८ पोलिस मुंबईतले होते. सुमारे अडीच हजार पोलिसांना याची बाधा झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या १ हजार ५१० पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

सांगली जिल्ह्यात काल ४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या १२८ झाली असून आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला.

उल्हासनगरमध्ये कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळून आल्यानं कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४४२ झाला आहे. आतापर्यंत १८६ रुग्ण बरे झाले तर १७ जणांचा मृत्यू झाला.

वर्धा जिल्ह्यातले ४ रुग्ण काल कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं . ग्रीन झोन असलेला जिल्हा १० मे रोजी कोरोनाबाधित जिल्हा म्हणून पुढे आल्यानंतर आज एक महिन्याच्या आत वर्धा जिल्ह्यातले सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८९ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१ जण उपचारानंतर बरे झाले, तर दोन जणांचा मृत्यू झाला.

अहमदनगर जिल्ह्यात काल १८ जण कोरोनाबाधित आढळून आल्यानं जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९५ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात काल ६४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ५ जणांचा मृत्यू झाला.

सांगली जिल्ह्यात काल कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२८ झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात काल १० जण कोरोना पॉसिटीव्ह आढळून आले. आतापर्यंत ४६ जण उपचारानंतर बरे झाले असून ३ जणांचा मृत्यू झाला.

सातारा जिल्ह्यात काल १८ जण कोरोना पॉसिटीव्ह आढळून आले . रत्नागिरी जिल्ह्यात काल ९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ३४३ झाली आहे. आतापर्यंत एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला तर १२५ रुग्णांना करोनामुक्त झाल्यानं घरी सोडण्यात आलं.