नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारपासून आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जे कर्मचारी या दिवशी कार्यालयात येणार त्यांची आठवडाभराची रजा गृहित धरली जाईल किंवा त्यांना त्या आठवड्याचे वेतन मिळणार नाही.
राज्य सरकारने यासंदर्भातले आदेश आज प्रसिद्ध केले आहेत. पूर्वमंजूर रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना आठवड्यात एकापेक्षा जास्त दिवस हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
त्यापैकी काही कर्मचारी काही दिवस उपस्थित असतात तर इतर दिवशी आदेश देऊनही कार्यालयात येत नाही. अशा कर्मचाऱ्यांची ज्या दिवशी उपस्थित असतील त्याव्यतिरीक्त इतर दिवसांची रजा गृहित धरली जाणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परवानगी शिवाय मुख्यालय सोडले आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.