मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहनमंत्री अनिल परब आज सक्तवसूली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या मुख्यालयात हजर झाले. भाजपा नेते किरिट सोमैय्या यांनी परब यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांतर्गत ई़डीनं परब यांना समन्स बजावलं होतं. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी देखील परब यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी 50 कोटी वसुलण्याचा आरोप केला होता. ही चौकशी लांबण्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.