पुणे : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बी.जे.रोड येथील राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांकडून कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, सचिव बाबाराव बोडखे, सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे, उपाध्यक्ष हिरामण सातकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सहनिबंधक ग्रामीण मिलिंद सोबले आदी उपस्थित होते.