नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीनं सलग आठव्यांदा व्याज दरात काहीही बदल केले नाहीत. आज मुंबईत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी, रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय एकमतानं घेतल्याचं स्पष्ट केलं. यामुळे रेपो दर अर्थात रिझर्व बॅंकेकडून इतर बँकांना देण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याजदर  ४ टक्के आणि रिवर्स रेपो रेट ३ पूर्णांक ३५ शतांश टक्के राहील. जोपर्यंत कोविड मुळे  निर्माण झालेली स्थिती पूर्वपदावर येत नाही आणि चलन वाढीचा दर नियंत्रणात आहे तोपर्यंत पत धोरण समावेशकच राहील हे देखील त्यांनी स्पष्ट केलं.