नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्के झाला आहे. काल १३ हजार १९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ३ कोटी ३६ लाख १४ हजाराच्यावर गेली आहे. काल १४ हजार ३४८ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात सुमारे १ लाख ६१ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत बाधित झालेल्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी, ४७ शतांश टक्के आहे.