नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गंत विमान प्रवासात प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि मासिकं द्यायला विमान कंपन्यांना परवानगी दिली आहे. कोविड १९ मुळं या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. खाद्यपदार्थ पुरवताना प्रवासाच्या वेळेचं कुठलंही बंधन मंत्रालयानं घातलेलं नाही.