मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कारप्राप्त सर्वांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतली कामगिरी अभिमानास्पद आहे. यातून राज्याची मान देशातच नाही तर जगातही गौरवाने उंचावली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. ‘स्वच्छतेतून आरोग्याकडे, आरोग्यातून विकासाकडे’ सुरु असलेली राज्याची वाटचाली अशीच सुरु  राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पुरस्कारप्राप्त शहरांचे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन करतानाच राज्यातील इतर सर्व शहरांनी पुढच्या काळात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी होऊन उज्ज्वल कामगिरी करण्याचं आवाहन नगरविकासमंत्री शिंदे यांनी केलं आहे.नवी दिल्लीमध्ये प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये एकूण पुरस्कारांच्या ४० टक्के पुरस्कार हे महाराष्ट्राला आहेत. वन स्टार मानांकनांमध्ये १४७ पैकी ५५ शहरं, तर थ्री स्टार मानांकनांमध्ये १४३ पैकी ६४ शहरं आणि फाईव्ह स्टार मानांकनांमध्ये देशातल्या ९ शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश झाला आहे.