नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेत देशानं ११८ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या एकूण मात्रांची संख्या ११८ कोटी ४८ लाखाच्या वर गेली. आज सकाळपासून सुमारे २० लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. महाराष्ट्रात काल १० हजार ३६१ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ७ लाख ५६ हजार ९५५ नागरिकांना लस दिल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. राज्यात आतापर्यंत १० कोटी ८४ लाख ७० हजार ६७७ मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.