नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं परमबीर सिंग यांना निलंबीत केलं आहे. राज्याच्या गृह विभागानं या संदर्भात आज एक पत्रक जारी केलं आहे. या निलंबन काळात परमबीर सिंग यांना अखिल भारतीय सेवेच्या नियम नुसार देय असलेले सर्व भत्ते दिले जातील.

या साठी परमबीर सिंग अन्य ठिकाणी नोकरी करत नसल्याचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक राहील, असंही या पत्रकात म्हटलं आहे. या काळात सिंग यांना पोलीस मुख्यालय सोडता येणार नाही, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.