नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा आज संसदेत नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर निवेदन दिलं. याविषयीचा मुद्दा आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित केला गेला. लोकसभेत नागालँडमधले एन.डी.डी.पी.चे खासदार तोखेहो येपथोमी यांनी तातडीच्या मुद्दा म्हणून हा विषय उपस्थित केला. या गोळीबारामुळे निरपराध लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी म्हटलं. या घटनेतल्या पीडित कुटुंबांना योग्य केंद्र सरकारनं तातडीनं योग्य नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई केली तर, द्रमुकचे टी आर बालू यांनी या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठीचे प्रयत्न व्हावेत अशी प्रतिक्रिया दिली. ए.आय.टी.सी.चे. सुधीप बंडोपाध्याय, शिवसेनेचे विनायक राऊत, जनता दल युनायटेडचे राजीव रंजन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि इतर अनेक सदस्यांनीही या विषयावर आपली मतं नोंदवली. गृहमंत्री राज्यसभेतही या विषयावर निवेदन देणार असल्याचं राज्यसभेचे सभापती एम. व्यंकैय्या नायडू यांनी सांगितलं आहे.