नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. त्यानंतर ते रायगडावर रवाना झाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं. पुण्यामध्ये लोहगाव इथल्या भारतीय वायुसेनेच्या तळावर उद्या होणाऱ्या हवाई प्रात्यक्षिकांना राष्ट्रपती उपस्थित राहतील तसंच हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधतील. त्यांनतर बुधवारी ८ डिसेम्बर रोजी मुंबईत भारतीय नौदलाच्या ‘ट्वेन्टी सेकंड मिसाईल स्क्वॉड्रन’ला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंट स्टॅंडर्डनं सन्मानित केलं जाणार आहे. मुंबई नौदल गोदीत होणाऱ्या या समारंभाला राज्यपाल, मुख्यमंत्री, नौदल प्रमुख आणि अन्य अधिकारी तसंच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.