नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आजवर १२९ कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात सुमारे ७१ लाख लोकांनी लस घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. देशातल्या ८५ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीची किमान पहिली मात्रा घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी काल ट्वीट संदेशातून दिली असून; या निमित्त देशातील जनतेचं अभिनंदनही केलं आहे. देशात काल दिवसभरात १० हजारहून जास्त जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले तर ६ हजार ८२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या सुमारे ९५ हजार ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशाचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के इतकं आहे.