नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आजपासून २ दिवस बांग्लादेशाच्या दौऱ्यावर जात आहेत. ते आज बांगलादेशाचे परराष्ट्र मंत्री ए के अब्दुल्ल मोमीन आणि  परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमीन यांची भेट घेतील. उद्या ते बांग्लादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांची भेट घेतील. या दौऱ्यादरम्यान ते बांगलादेशचे रस्ते वाहतूक मंत्री ओबेदुल कादर यांची भेट घेतील. शेजारी राष्ट्र प्रथम या नीती अंतर्गत भारताचे बांग्लादेशाबरोबर मैत्रीपूर्ण दृढ संबंध असून हे या मैत्रीचं सुवर्ण महोत्सवी  वर्ष आहे. काल साजऱ्या झालेल्या मैत्री दिवसाच्या पार्शवभूमीवर श्रींगला यांचा हा दौरा दोन्ही देशातले परस्पर संबंध आणखी दृढ करेल.