मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी च्या ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. ते सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास त्यांना कामावर घेतलं जाईल अस परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. एस. टी. कर्मचाऱ्यांना एक संधी द्यावी या हेतूनं हा निर्णय घेतला असल्याचंही ते म्हणाले. या कामगारांना कामावर हजर होण्यास अडचण आल्यास त्यांनी नजिकच्या पोलिस स्टेशन वा डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि विलिनीकरणाच्या बाबतीत अहवाल सादर करायला दिलेल्या बारा आठवड्यांच्या मुदतीमुळे राज्य शासन आणि कामगार आता त्याला बांधिल आहेत. त्यामुळे तोपर्यंत काही निर्णय घेता येणार नाही असंही ते म्हणाले.  सोमवार पर्यंत कामावर न आलेल्या कामगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले.