नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वातावरण बदल आणि सुरक्षा याविषयावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीनं मांडलेल्या प्रस्तावमसुद्याच्या विरोधात भारतानं काल मतदानकेलं. वातावरण बदलावरच्या कारवाईची चौकशी करण्याच्या तसंच ग्लास्गो परिषदेत अतिशय मेहनतीनंआणि एकमतानं तयार केलेल्या करारांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या मसुद्यात केलाअसल्याचं भारताचं म्हणणं आहे. वातावरण बदलासंदर्भात कारवाई आणि न्यायाच्या मुद्यावरभारत कोणाच्याही मागं नाही. मात्र, सुरक्षा परिषद हा या विषयावरच्या चर्चेचा मंच नाही,असं संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस त्रिमूर्ती यांनी सांगितलं. योग्य मंचावर चर्चा होणं टाळण्याचा तसंच हवामानबदलासंदर्भात कारवाई करण्याबाबत होणारीटाळाटाळ लपवण्याचा प्रयत्न यातून होतोय, असं दिसतं. त्यामुळे या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याव्यतिरिक्तभारताकडे कोणताही पर्याय नाही, असं ते म्हणाले. वातावरण बदलाला आळा घालण्याबाबत भारताच्या कटीबद्धतेविषयी कसलाही संभ्रम असता कामा नये,अफ्रिकेसह सर्व विकसनशील देशांच्याहितासाठी भारत नेहमी आवाज उठवत राहिल, असं त्यांनी स्पष्ट केलं.