नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा सन्मान वृद्धिंगत करणारी अनेक पावलं केंद्र सरकारनं उचलली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथल्या कार्यक्रमात बोलत होते.

अनेक दशकांपासून घर आणि मालमत्ता हा केवळ पुरुषांचा हक्क मानला जात होता, अशी टीका पंतप्रधानांनी केली. सरकारच्या योजना ही विषमता दूर करत आहेत, असे ते म्हणाले.रोजगार आणि कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये महिलांना समान भागीदार बनवले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.