नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणत्याही संकटाच्या काळात बिमस्टेक देशांच्या सहकार्यासाठी भारत कटिबध्द आहे, अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यात दिली. बिमस्टेक देशांच्या सदस्य राष्ट्रांसाठी “मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव,पॅनेक्स-21” दरम्यान ते बोलत होते. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन उपस्थित होते. Panex 21 या सरावामुळे चक्रीवादळ, भूकंप आणि कोरोनासारख्या संकटांना सामोरं जाण्यासाठी सहकार्य आणि सामंजस्य निर्माण होण्यास मदत होईल, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

आत्मनिर्भर भारत अभियनांतर्गत भारतात उत्पादित झालेल्या संरक्षण उपकरणांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज झालं. यावेळी नैसर्गिक आपत्तीत सहकार्याने केलं जाणारं बचाव कार्य याबाबत प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. यामध्ये पोलीस विभाग, आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, स्थानिक प्रशासन विभाग, आरोग्य विभाग यांचा संयुक्त सहभाग होता. कार्यक्रमाला उपस्थित बिमस्टेक देशांच्या प्रतिनिधींचासिंह यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.