नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमध्ये तलिबाननं सत्ता हाती घेतल्यानंतर आतापर्यंत ६ हजार ४०० हून अधिक माध्यम प्रतिनिधींना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामधील महिला पत्रकारांपैकी ८० टक्क्यांहून अधिक महिलांना नोकरी सोडून द्यावी लागली आहे. तलिबाननं माध्यमांच्या विरुद्ध सुरु केलेल्या कारवाईमुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रकारांच्या दोन संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार २३१ माध्यम केंद्रं आतापर्यंत बंद करावी लागली, तसंच ६० टक्के पत्रकार आणि माध्यम कर्मचारी आता अफगाणिस्तानमध्ये काम करण्यास असमर्थ असल्याचं त्यात म्हटलं आहे.