नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची युक्रनेची साथीदार नादिया किचेनोक यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सानिया किचनोक जोडीनं उपांत्य फेरीत तमारा जि़दानसेक आणि  मेरी बाउज़कोव या जोडीला 7-6, 6-2 असं हरवलं. अंतिम सामन्यात सानिया आणि नादिया या जोडीची गाठ चीनच्या द्वितीय मानांकित शुवाई पेंग आणि  शुवाई झांग या जोड़ीशी होणार आहे.