नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोगासाठी अमेरिकी सिनेटच्या सदस्यांना न्यायमंडळाचे सदस्य म्हणून काल शपथ देण्यात आली. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस यांनी सदस्यांना शपथ दिली.

महाभियोगाचं कामकाज जॉन रॉबर्टस यांच्या अध्यक्षतेखाली चालणार आहे. येत्या मंगळवारी महाभियोगाचं कामकाज पुन्हा सुरु होईल, असं रिपब्लीकन खासदारांचं बहुमत असलेल्या सिनेटचे नेते मिच मॅकोनेल यांनी सांगितलं. दरम्यान ही कारवाई जास्त वेळ चालणार नाही, असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत त्यांनी ते फेटाळून लावले आहेत.