मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरूवार दि. ३० डिसेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर https:/twitter.com/MahaDGIPR

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पर्यटन विभागाच्या कामकाजावर आधारित ही मुलाखत घेण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान, या अभियानाचे स्वरूप. ग्लासगो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्याचा करण्यात आलेला गौरव, पर्यावरण व हवामान बदल रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग, कृषी पर्यटन, कॅरॅव्हॅन व कॅम्परव्हॅन ही नवीन संकल्पना, मुंबईचा पर्यटनदृष्ट्या विकास आदी विषयांची माहिती श्री. ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.