नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यातीवर गेले सहा महिने असलेली बंदी उठवायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिगटाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला रबी हंगामात कांद्याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेऊन, शेतक-यांचं हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या संदर्भात परदेशी व्यापार महासंचालकांनी अधिसूचना जारी केल्यानंतर हा निर्णय लागू होईल. कांद्याचे किमान निर्यात दर कमी किंवा रद्द करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.