मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, असं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळत असले तरी त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं आणि ऑक्सिजन द्यावं लागण्याचं प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढेल तेव्हा लॉकडाऊनचा विचार करू असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही त्यांना ऑक्सिजन देण्याची गरज पडते. त्यामुळं नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं अशी विनंती त्यांनी केली. मुंबईत लसीकरण पूर्ण केलेल्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. हे नागरिक तुलनेनं सुरक्षित आहेत त्यामुळं सध्या तरी लोकल प्रवासावर निर्बंध लादण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले.