मुंबई (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वे कळवा आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गिकांवर उद्या दुपारी दोन वाजल्यापासून ३६ तासांचा मेगाब्लॉक घेईल. या मेगाब्लॉकमध्ये मध्यरेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांची जोडणी तसंच ठाणे दिवा दरम्यान मार्गिकांची अदलाबदली ही कामे प्राधान्याने केली जातील. हा मेगाब्लॉक सोमवारी रात्री १ वाजेपर्यंत असेल. या दरम्यान कल्याण आणि माटुंगा यांच्यामध्ये अप धीम्या मार्गावरच्या गाड्या जलद मार्गावरून धावतील. या मेगाब्लॉकमुळे काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे आणि काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.