नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत १५८ कोटी ३३ लाखापेक्षा जास्त लस मात्रा दिल्या गेल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. देशात काल ७९ लाख ९१ हजार लसमात्रा दिल्या गेल्याचं यात म्हटलं आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ९ शतांश टक्के इतका आहे. काल १ लाख ५७ हजाराहून जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ५३ लाख ९४ हजाराहून जास्त आहे. देशात सध्या १७ लाख ३६ हजार ६२८ रुग्ण उपचार घेत आहेत. काल २ लाख ३८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. देशात आतापर्यंत ८ हजार ८९१ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले. तर काल ३१० रुग्ण उपचारादरम्यान दगावले. देशात आतापर्यंत ७० कोटी ५४ लाखापेक्षा जास्त कोविड निदान चाचण्या करण्यात आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.