नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच  पॅनलवर भारताच्या नीतीन मेनन यांची नेमणूक झाली आहे. ही नेमणूक 2020-21 या कालावधीसाठी आहे. इंग्लडच्या निगेल लॉग यांच्या जागेवर ही नेमणूक झाली आहे.

या प्रतिष्ठेच्या पदावर नेमणूक झालेले नीतीन  मेनन हे तिसरे भारतीय आहेत. यापूर्वी  श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदरम रवि यांनी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहिलं आहे. नितीन मेनन 36 वर्षीय असून आतापर्यंत 3 कसोटी, 24 एकदिवसीय आणि 16 टी-20 क्रिकेट सामन्यांसाठी त्यांनी पंच म्हणून काम पाहिलं आहे.