नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. ही परवानगी दरमहा ५० लाख कीट्सकरता आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आजच्या ट्विटर संदेशात सांगितलं आहे.