नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ३८४ शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. यात १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पदकं, ४ उत्तम युद्ध सेवा पदकं, ५३ अतिविशिष्ट सेवा पदकं, १३ युद्ध सेवा पदकं, थ्री बार विशिष्ट सेवा पदकं, १२२ विशिष्ट सेवा पदकांचा समावेश आहे. याशिवाय ८१ सेना शौर्य पदकं, दोन वायुसेना शौर्य पदकं, कर्तव्यनिष्ठेसाठी ४० सेना पदकं ८ नौसेना पदकं आणि १४ वायु सेना पदकांना मंजुरी मिळाली आहे. बारा शौर्य चक्र विजेत्यांपैकी ९ जणांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.  याशिवाय टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतल्या भालाफेक खेळातला सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल परम विशिष्ट सेवा पदकानं गौरवण्यात आलं.