मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरु असलेला मास्कचा वापर थांबवून, मास्क मुक्ती करावी की करू नये याबाबत राज्याच्या कोविड विषयक कृती दलानं विज्ञानिष्ठ अभ्यास करावा, त्याआधारे निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत कोविडविषयीचं सादरणीकरण झालं. या सादरीकरणात, ब्रिटनसह काही देशांनी मास्कची सक्ती मागे घेतल्याचा मुद्दाही मांडला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय विज्ञाननिष्ठ आहे की नाही हे तपासून पाहायला हवं, त्यासाठी राज्याच्या कोविड विषयक कृती दलानं अभ्यास करायला हवा असं त्यांनी म्हटलं आहे.